
नाशिक, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। नाशिक जिल्हा तसेच देवळा-चांदवड तालुक्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी देत माजी आमदार व कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी आपल्या अनेक समर्थक आणि तालुका जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. चांदवड- देवळा तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि नक्कीच त्यांच्या प्रवेशाचा भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल असे मानले जात आहे. विद्यमान आमदार डॉ.राहूल आहेर यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
भाजप शहर कार्यालय ‘वसंतस्मृती’ येथील भव्य कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला त्यांच्या सोबत नाशिक महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गुरुमित बग्गा,मा. नगरसेविका नंदिनी बोडके, कादवा सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते,मा.नगरसेविका कै. विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील व निलम पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर महाराष्ट्र प्रमुख गौरव गोवर्धने,व्यापारी गौरव अग्रवाल तसेच अनेक सरपंच, माजी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सहकारी पतसंस्था, बँका, कारखान्याचे संचालक अशा अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन,आ.राहूल आहेर, मा. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, आ. सीमाताई हिरे, आ. राहूल ढिकले, भाजप नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, बाळासाहेब सानप,मा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, शहर सरचिटणीस अमित घुगे, सुनील देसाई, श्याम बडोदे, पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण भाटे व अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV