
नवी दिल्ली , 13 नोव्हेंबर (हिं.स.)। सुप्रीम कोर्टात एअर इंडिया विमान दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपला पक्ष मांडताना सांगितले की, प्राथमिक तपास अहवालात एअर इंडियाच्या वैमानिकाला (पायलटला) या दुर्घटनेसाठी जबाबदार धरलेले नाही.
या प्रकरणात केंद्राने सुप्रीम कोर्टाला कळवले की, एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) या संस्थेची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आणि ही चौकशी अद्याप सुरू आहे. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक अहवालात एअर इंडिया विमान दुर्घटनेसाठी पायलटला जबाबदार धरलेले नाही.
१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानाचे उड्डाणानंतर अवघ्या ३२ सेकंदात अपघात झाला आणि विमान एका इमारतीवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत एका प्रवाश्याला वाचवून बाकी २६० जणांचा मृत्यू झाला. एएआयबीच्या अंतर्गत झालेल्या चौकशीत या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या होत्या आणि अपघाताचे कारण वैमानिकाची चूक असल्याचे सूचित करण्यात आले होते.
मात्र, हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर त्या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांचे वडील पुष्करराज सभरवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. मागील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महानिदेशालय (डिजिसीए) यांच्याकडून उत्तर मागवले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode