दत्तक प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच व्हावी!
अकोला, 13 नोव्हेंबर (हिं.स.) दत्तक प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच पूर्ण करावी. बेकायदा मार्गाचा वापर दंडनीय अपराध आहे, असे आवाहन महिला बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी केले आहे. बाल न्याय अधिनियम 2022 ची पूर्तता न करता दत्त विधान केल्यास सद
दत्तक प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच व्हावी!


अकोला, 13 नोव्हेंबर (हिं.स.) दत्तक प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच पूर्ण करावी. बेकायदा मार्गाचा वापर दंडनीय अपराध आहे, असे आवाहन महिला बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी केले आहे.

बाल न्याय अधिनियम 2022 ची पूर्तता न करता दत्त विधान केल्यास सदर व्यक्तीस तीन वर्षापर्यंत तुरूंग किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात तसेच कोणत्याही उद्देशाने बालकाची विक्री किंवा खरेदी केल्यास व्यक्तीस पाच वर्षापर्यंत सक्षम कारावास आणि एक लाख रुपये पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते . त्यामुळे जिल्ह्यामध्ये कायदेशीर दत्त विधानाची प्रक्रिया पूर्ण करूनच दत्तक विधान करावे, असे आवाहन श्री. गिरीश पुसतकर यांनी केले आहे

अकोला जिल्ह्यामध्ये उत्कर्ष शिशुगृह, मलकापूर, अकोला ही मान्यता प्राप्त विशेष दत्तक संस्था कार्यरत आहे. तरी इच्छुक पालकांनी कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता बालगृह विशेष दत्तक संस्था, चाईल्ड लाईन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, संतोषी माता मंदिराच्या मागे येथे संपर्क करावा. दत्तक इच्छुक पालकांनी मिशन वात्सल्य या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर संबंधित पालकाची गृह चौकशी करण्यात येते. पालक जर नियमावली 2022 नुसार पात्र असतील तर त्या पालकांची गृह चौकशी पोर्टलवर अपलोड करण्यात येते त्यानंतर त्या पालकांची दत्तप्रक्रिया सुरू होते ही सर्व प्रक्रिया विनामूल्य आहे, असे सुनील लाडूलकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande