जालना - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जालना, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)।साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जालना जिल्हा कार्यालयास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता थेट कर्ज योजना राबविली जात आहे. तरी जालना जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी आपले थेट कर्ज योज
जालना - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन


जालना, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)।साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जालना जिल्हा कार्यालयास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता थेट कर्ज योजना राबविली जात आहे. तरी जालना जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी आपले थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दि.13 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अर्जदाराचे वय 18 वर्ष पुर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 3 लाख पेक्षा जास्त नसावे तसेच अर्जदाराने या पुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन सदर योजनेत साधरणपणे सामाविष्ट लघु व्यवसाय (उदा. शेळीपालन, फळभाजी विक्री, हॉटेल व्यवसाय, फिरते साडी सेंटर, झाडु टोपले, शिलाई मशिन, ब्युटीपार्लर, म्हसाला उद्योग, पापड उद्योग, फिरते कापड व्यवसाय, बेकरी, द्रोण पत्रवाळी इत्यादी व्यवसायासाठी) कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत खालील ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहुन दाखल करावे त्रयस्त/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तसेच या पुर्वी थेट कर्ज योजनेचे ऑनलाइन केलेले कर्ज अर्ज प्रस्ताव ग्राह्य झालेले आहे.

कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, तीन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे परपत्रक (कोटेशन),व्यवसाय ज्या टिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, (नमुना नं ०८, लाईट बिल व टॅक्स पावती),ग्रामपंचायत/नगरपालीका/महा नगरपालीका यांचे प्रमाणपत्र किंवा शॉप अॅक्ट परवाना, व्यवसायासंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र, अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा. प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वताःच्या स्वाक्षरीने साक्षांकीत करावी. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.

वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स हस्तालिखित, टंकलिखित केलेला कर्ज अर्ज देणे व स्विकारणे दि. 13 नोव्हेंबर 2025 ते दि. 13 डिसेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळूण सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या ) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालया समोर जालना या ठिकाणी स्विकारले जातील. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जालना यांनीकळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande