अमरावती : भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई आक्का यांनी दाखल केलं नामांकन
अमरावती, 13 नोव्हेंबर, (हिं.स.) धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या झुंजार व कर्तव्यदक्ष भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांनी नामांकन आपले लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार प्रताप अडसड यांचे नेतृत्वात तहसील कार्या
भाजपाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई आक्का यांनी केला नामांकन दाखल ,


अमरावती, 13 नोव्हेंबर, (हिं.स.) धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या झुंजार व कर्तव्यदक्ष भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांनी नामांकन आपले लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार प्रताप अडसड यांचे नेतृत्वात तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे दाखल केले.

शहरातील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भगवे झेंडे यांच्या गजरात उमेदवारांनी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाच्या सभागृहात दाखल केलेले नामांकन लक्षवेधी ठरले. या वेळी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. भाजपाचे उमेदवार डॉ. अर्चनाताई अडसड रोठे (आक्का) यांनी पक्षाच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत विकासाच्या ध्यासासाठी हे नामांकन असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande