


नाशिक, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री काळाराम मंदिराला भेट देऊन प्रभु श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. श्री काळाराम संस्थानतर्फे मुख्यमंत्र्यांनचे संस्थानचे विश्वस्त मंडळाने सन्मानपूर्वक स्वागत केले. संस्थानतर्फे वारकरी फेटा व तुळशीहार प्रभू श्रीराम यांची फ्रेम, शाल देऊन मुख्यमंत्री यांचा गौरव करण्यात आला.
राम कालपथ यामुळे मंदिरात होणारे विविध प्रकारचे विकास कामे , मंदिर परिसराची होणाऱ्या सुशोभीकरण व भाविकांच्या सोयी सुविधा याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे माननीय मंत्री महोदय दादा भुसे गिरीशजी महाजन हे देखील उपस्थित होते आमदार राहुल ढिकले व सीमाताई हिरे हेदेखील उपस्थित होत्या या भेटीप्रसंगी संस्थेचे विश्वस्त शांताराम आवसर, सीए शुभम मंत्री, मिलिंद तारे, मंगेश पुजारी, मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी धनंजय पुजारी हे उपस्थित होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV