हिंगोली कापूस खरेदी : जिल्ह्यात 4 स्थानिक निगराणी समित्या स्थापन
हिंगोली, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। हमी दराने कापूस विक्री करण्यासाठी हंगाम सन 2025-26 मध्ये भारतीय कापूस (कपास) निगम लिमिटेड यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कापूस किसान मोबाईल ॲप्लीकेशन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या ॲपद्व
हिंगोली कापूस खरेदी : जिल्ह्यात 4 स्थानिक निगराणी समित्या स्थापन


हिंगोली, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। हमी दराने कापूस विक्री करण्यासाठी हंगाम सन 2025-26 मध्ये भारतीय कापूस (कपास) निगम लिमिटेड यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कापूस किसान मोबाईल ॲप्लीकेशन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

या ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि कापूस लागवड क्षेत्राच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी व राज्यातील कापसाची किमान आधारभूत किंमतीने खरेदीची कार्यवाही करण्यासाठी व राज्यातील कापसाची किमान आधारभूत किंमतीने खरेदीची कार्यवाही प्रभावी व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कापूस उत्पादक क्षेत्रात तालुकास्तरावरील अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून स्थानिक सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

भारतीय कपास निगम लिमिटेड औरंगाबाद यांनी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सन 2025-26 या हंगामामध्ये भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्यामार्फत कापूस खरेदीसाठी हिंगोली जिल्ह्यात 4 खरेदी केंद्राच्या ठिकाणी स्थानिक निगराणी समित्यांची स्थापना केली आहे.

हिंगोली येथील कापूस खरेदी केंद्रावर तहसीलदार श्रीकांत भुजबळ (9657719474) यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था एम. यु. यादव (9420433838) यांची तर तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब (8766403179), भारतीय कपास निगम लि.चे केंद्र प्रमुख उमेश डाबेराव (8074652750), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन. बी. पाटील (9923810853) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वसमत येथील कापूस खरेदी केंद्रावर तहसीलदार शारदा दळवी (9623602173) यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था के. एम. कलेटवाड (8975943111) यांची तर तालुका कृषी अधिकारी सुनिल भिसे (7588018667), भारतीय कपास निगम लि. चे केंद्र प्रमुख उमेश डाबेराव (8074652750), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस. एन. शिंदे (9921121587) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कापूस खरेदी केंद्रावर तहसीलदार जिवककुमार कांबळे (8698995092) यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था ए.डी.गुठ्ठे (7020475834) यांची तर तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव (7588153150), भारतीय कपास निगम लि.चे केंद्र प्रमुख उमेश डाबेराव (8074652750), आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन. आर. सावळे (9370070943) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार कापूस खरेदी केंद्रावर तहसीलदार हरीष गाडे (9158584577) यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था ए.डी.गुठ्ठे (7020475834) यांची तर तालुका कृषी अधिकारी श्री. संगेकर (8408840487), भारतीय कपास निगम लि.चे केंद्र प्रमुख उमेश डाबेराव (8074652750), जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस. एस. डोळस (7888282826) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक निगराणी समितीने भारतीय कपास निगम लिमिटेडच्या तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावर कपास किसान ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या नोंदणीमधील अडचणीची सोडवणूक करणे, कपास किसान ॲपबाबत प्रसिध्दी देणे, कापूस खरेदी प्रक्रियेवर देखरेख ठेवणे, शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी निकाली काढणे, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष हेल्पलाईन किंवा व्हॉटस्अप क्रमांक उपलब्ध करुन देणे, स्थानिक निगराणी समितीच्या दरमहा सभा आयोजित करणे, कापूस खरेदीबाबत वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधून अहवाल सादर करणे इत्यादी स्वरुपाचे कामकाज करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande