
जालना, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। जालना जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुधीर चाटे, घनसावंगी तहसीलदार पुजा वंजारी, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात व संगिता भागवत, संगिता सानप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विक्रम सारुक, उप शिक्षणाधिकारी श्री. पुजारी, संजय कांयदे, विनया वडजे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी पायाभूत सोयी सुविधा, सुरक्षा, गुणवत्ता शिक्षण देण्यात यावे व या विद्यालयांना मॉडेल स्कूल करण्यासाठी प्रयत्न करावेत ज्यामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल व महिला सक्षमीकरणास मोठे योगदान मिळेल. जालना जिल्ह्यात जाफ्राबाद तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्याच्या ठिकाणी टाईप 2 मधील ज्या ठिकाणी शाळा व निवासाची व्यवस्था एकत्र असणारे व टाईप 4 मधील म्हणजे ज्या ठिकाणी केवळ निवासाची व्यवस्था असणाऱ्या अशा एकूण दोन प्रकारातील एकूण 14 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये 1667 मुली शिक्षण घेत आहेत. या मुलींसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्देश दिले. यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालय योजना मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रम व राजीव गांधी अपघात विमा योजनेचा सविस्तर आढावा घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis