ऊसतोड मजूर, कंत्राटदारांच्या अनुचित मागण्यांना बळी न पडण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
हिंगोली, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। ऊस तोडणी मजूर, मुकादम व कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना अनुचित मागण्या आल्यास त्यांना शेतक-यांनी बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात चालू 2025-26 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारण 145
ऊसतोड मजूर, कंत्राटदारांच्या अनुचित मागण्यांना बळी न पडण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


हिंगोली, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

ऊस तोडणी मजूर, मुकादम व कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना अनुचित मागण्या आल्यास त्यांना शेतक-यांनी बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात चालू 2025-26 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारण 145 ते 150 दिवसात गाळप होईल एवढी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यानी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करु नये. ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे. तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याकडून रोख पैशाची व अन्य वस्तू , सेवांची मागणी केली जाते, अशा अनुचित मागण्यांना त्यांनी बळी पडू नये. तसेच याबाबत काही तक्रार असल्यास कारखान्याचे खालील तक्रार निर्धारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. डोंगरकडा, ता. कळमनुरी (शेतकी अधिकारी एल. टी. पुयड मो. 9552587364), पुर्णा सहकारी साखर कारखाना लि., वसमतनगर ता. वसमतनगर (जनसंपर्क अधिकारी आर. पी. गुंडाळे मो. 9421381314), कपीश्वर शुगर अँन्ड केमिकल लि., जवळाबाजार ता. औंढा नागनाथ (मुख्य शेतकी अधिकारी आर. एस. देशमुख मो. 9881904555), टोकाई सहकारी साखर कारखाना लि. कुरूंदा ता. वसमतनगर (शेतकी अधिकारी पी. जी. गायकवाड मो. 9422176098), शिऊर साखर कारखाना प्रा. लि. वाकोडी, ता कळमनुरी (ऊस पुरवठा अधिकारी व्ही. आर. तावडे मो. 9403016721) .

संबंधित तक्रार निवारण अधिकारी यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण न केल्यास, दखल न घेतल्यास आपण प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड या कार्यालयाचे ई-मेल आयडी nanded@rectittima.com वर आपली तक्रार दाखल करावी अथवा 02462-254156 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन विश्वास देशमुख, प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande