सोलापूर - पारेवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने नेत्यांना गावबंदी
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पारेवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतर केत्तूर असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर रोजी चुकीच्या शिफारस पत्रावरून नामकरण करण्याचे अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी पारेवाडी ग्रामस
सोलापूर - पारेवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने नेत्यांना गावबंदी


सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

पारेवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतर केत्तूर असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर रोजी चुकीच्या शिफारस पत्रावरून नामकरण करण्याचे अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी पारेवाडी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. सर्व नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.पारेवाडी गावच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. 14 नोव्हेंबर रोजी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने राजपत्र शासन निर्णय क्रमांक 443 काढलेे आहे, ते रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पारेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.पारेवाडी ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, स्थापनेपासून पारेवाडी रेल्वे स्टेशन असे नाव होते ते योग्यच आहे. पारेवाडी रेल्वे स्थानक व ट्रॅकसाठी पारेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण गेल्या पन्नास वर्षांपूर्वीच केलेे होते. मोबदलाही शेतकऱ्यांना दिला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande