
जळगाव, 13 नोव्हेंबर (हिं.स.)गोदावरी फाउंडेशन्सचे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान-सक्षम युग: नर्सिंगची डिजिटल पल्स स्वीकारणे (टेक एनेबल्ड एरा एमब्रासिंग द डीजिटल पल्स ऑफ नर्सिंग) आंतरराष्ट्रीय परिषद २०२५ चे १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. अक्षता पाटील कॉन्फरन्स हॉल, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे ऑनलाईन व ऑफलाईन मोडमध्ये आयोजित केली आहे.
या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या नर्सिंग फॅकल्टीच्या डीन डॉ. श्रीलेखा राजेश,डॉ एस जे नलिनी चेन्नई महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ श्रीजना प्रधान, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके, परिषदेच्या अध्यक्ष प्रा. विशाखा गणवीर, प्राचार्य, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग,उपप्राचार्य जेसिंथ ढया, मेन्टल हेल्थ नर्सिंगच्या प्रमुख प्रा अश्वीनी वैदय,इ मान्यवर उपस्थीत होते. ही परिषद नर्सिंग शिक्षण, सराव, नेतृत्व आणि संशोधन क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानामुळे झालेल्या परिवर्तनाचा अभ्यास करणार आहे. नर्सिंग फॅकल्टी, नर्सिंग ऑफिसर, शिक्षणतज्ज्ञ, पदवीधर विद्यार्थी व पीएच.डी. संशोधकांसाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), टेलिहेल्थ, वेअरेबल टेक्नॉलॉजी, डेटा-आधारित पद्धती यासारख्या विषयांवर तज्ज्ञांचे सादरीकरण झाले.
स्वागत व परिचय सत्रानंतर अधिवेशनात डीजीटल ट्रान्सफॉरमेशन इन नर्सिंग एज्युकेशन अँन्ड प्रॅक्टीस या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान होईल. दुपारच्या सत्रात साईन्टीफीक पेपर प्रेझेंटेशन पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. दिवसाच्या शेवटी संवाद सत्र आणि प्रश्नोत्तर कार्यक्रमातून शंका निरसन करण्यात आले. आज शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ टेलिहेल्थ स्वीकारण्यातील अडथळ्यांवर मात करणे व नाविन्यपूर्ण उपाय, टेली-नर्सिंग एआय आणि डेटा-चालित नर्सिंग संशोधनात गोपनीयता, नीतिमत्ता आणि कायदेशीर बाबी आणि डिजिटल आरोग्यामध्ये जागतिक सहकार्य या विषयांवरील सत्रे होतील. दुपारी डिजिटल भविष्यासाठी परिचारिकांना सक्षम बनवणे या विषयावर पॅनल डिस्कशन होईल.परिषदेचा समारोप प्रमाणपत्र वितरणाने होणार आहे. या परिषदेत भारतासह फिलिपिन्स, सौदी अरेबिया, चेन्नई, सिक्कीम आणि कराड-पुणे येथील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. विशेष वक्त्यांमध्ये डॉ. दिप्ती सोर्टे (देहरादून), डॉ. मारिया ब्लेसिल्डा बोंटोल्लागुनो (फिलिपिन्स), डॉ. अबीर एम. अब्देलकादर (सौदी अरेबिया), डॉ. एस. जे. नलिनी (चेन्नई), डॉ. बरखा देवी (सिक्कीम), डॉ. मिनी रानी मेरी बेथ (सौदी अरेबिया) आणि डॉ. वैशाली मोहिते (कराड, पुणे) यांचा समावेश आहे.गोदावरी फाउंडेशन्सचे अध्यक्ष, महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही परिषद यशस्वी होणार असून, डिजिटल आरोग्यसेवेतील नवनवीन शक्यतांचा शोध घेण्यासाठी ही परिषद एक ऐतिहासिक व्यासपीठ ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर