
मुंबई, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : लिक्विड प्रॉपल्शन सिस्टम्स सेंटरला (एलपीएससी, इस्रो) पहिलेच ह्युमन-रेटेड एल110 स्टेज विकास इंजिन वितरित केल्याची घोषणा गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एअरोस्पेस व्यवसायाने केली आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रामला पाठबळ देण्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कामगिरीमुळे स्वदेशी उत्पादनातील उत्कृष्टतेसाठी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपची दृढ वचनबद्धता आणि अंतराळ संशोधनासाठी भारताच्या मेक इन इंडिया व्हिजनमध्ये त्यांचे योगदान अधोरेखित होते.
इस्रोने विकसित केलेले LVM3 गगनयान प्रक्षेपण वाहन हे भारतीय अंतराळवीरांना अवकाशात नेण्यासाठी डिझाइन केलेले ह्युमन-रेटेड प्रक्षेपण वाहन आहे. या मोहिमेत, क्रू मॉड्यूल (गगनयान कॅप्सूल) त्याचे नियोजित प्रयोग पूर्ण केल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात सुरक्षितपणे पुन्हा प्रवेश करेल.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या एअरोस्पेस बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख मानेक बेहरामकामदिन म्हणाले, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपसाठी हा केवळ एक महत्त्वाचा टप्पा नाही तर राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमात योगदान देणे हा एक सन्मान आणि जबाबदारी आहे, हे आम्ही जाणतो. आणि हे आम्ही सर्वोच्च वचनबद्धतेने पार पाडू. या कामगिरीमुळे इस्रो आणि एलपीएससीसोबतच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीला समर्थन मिळते. अंतराळ संशोधनात भारताचे नेतृत्व मजबूत करणारे मिशन-क्रिटिकल तंत्रज्ञान प्रदान करण्याची आमची क्षमता सिद्ध करते.
या टप्प्यासह, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षेला चालना देणारी प्रगत प्रणाली विकसित करण्यात इस्रोसोबतच्या सहकार्याचा वारसा अधिक भक्कम केला आहे. गेल्या चार दशकांमध्ये, या व्यवसायाने चांद्रयान, निसार, उच्च-परिशुद्धता इंजिन आणि घटकांचा पुरवठा करणाऱ्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे ज्यामुळे अवकाश संशोधनातील जागतिक नेतृत्व म्हणून भारताची ओळख निर्माण होण्यास मदत झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर