“ दहशतवाद्यांना अशी शिक्षा देऊ, भविष्यात कुणी विचारही करणार नाही” – गृहमंत्री
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील स्फोट प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. ज्यामुळे कोणीही पुन्हा अशा प्रकारची हिंसक कृती करण्याचे धाडस करणार नसल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. गुजरातमधील एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला
अमीत शाह, केंद्रीय गृहमंत्री


नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीतील स्फोट प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. ज्यामुळे कोणीही पुन्हा अशा प्रकारची हिंसक कृती करण्याचे धाडस करणार नसल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. गुजरातमधील एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऑनलाइन माध्यमातून संबोधित करत होते.

याप्रसंगी शाह म्हणाले की, हे भ्याड कृत्य करणारे आणि या कटाचे सूत्रधार दोघांनाही कायद्याच्या दारात उभे केले जाईल. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. भारत सरकार आणि गृहमंत्रालय यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या दोषींना दिली जाणारी शिक्षा जगाला हा संदेश देईल की आपल्या देशात कोणीही अशा प्रकारचा हल्ला करण्याचा विचारदेखील करू नये असा इशारा त्यांनी दिला. तसेच गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरुद्धची लढाई ज्या ठामपणे लढली आहे, ती जगभर मान्य केली गेली आहे. या जागतिक संघर्षात मोदी अग्रस्थानी भूमिका निभावत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या प्राथमिक तपासात आणखी एक संशयित गाडी सापडल्याचे समजले होते. तपास पथकांनी फरीदाबाद जिल्ह्यातून ती दुसरी गाडी लाल फोर्ड इकोस्पोर्ट जप्त केली. मात्र, आता तिसरी गाडी जी मारुती ब्रेझा असल्याचा संशय असून अद्याप बेपत्ता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही गाडी आरोपींनी रेकी (पाळत ठेवण्यासाठी) किंवा घटनेनंतर पसार होण्यासाठी वापरली असावी. या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या राज्यांत या गाडीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवत आहेत.या नव्या खुलाशानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली असून, राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande