भारताच्या अंध महिला क्रिकेटवीर सज्ज — इंडसइंड बँक ठरली सामर्थ्याचा स्तंभ
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण! जगातील पहिल्यावहिल्या महिला अंध टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय अंध महिला क्रिकेट संघ सज्ज झाला असून, या संघाला इंडसइंड बँकेने आपले दृढ पाठबळ जाहीर केले आहे. भारत आणि श्रील
“India's blind female cricketers ready — IndusInd Bank becomes a pillar of strength”


रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण! जगातील पहिल्यावहिल्या महिला अंध टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय अंध महिला क्रिकेट संघ सज्ज झाला असून, या संघाला इंडसइंड बँकेने आपले दृढ पाठबळ जाहीर केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही स्पर्धा पार पडणार असून नवी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलंबो येथे सामने खेळवले जाणार आहेत.

या उपक्रमाचे आयोजन क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) आणि समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले आहे. इंडसइंड बँक आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत या स्पर्धेतील भारतीय महिला संघाला आर्थिक आणि नैतिक पाठबळ देत आहे.

इंडसइंड बँकेचे कॉर्पोरेट, कमर्शियल आणि ग्रामीण बँकिंग प्रमुख संजीव आनंद म्हणाले, “जगातील पहिल्या महिला अंध टी-२० विश्वचषकासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाला पाठिंबा देणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. सर्वसमावेशकता ही आमच्या बँकेची मूल्यव्यवस्था आहे. या खेळाडूंच्या चिकाटी आणि निश्चयातून आम्हाला प्रेरणा मिळते.” दरम्यान, CABIचे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. किवदासन्नावर यांनी सांगितले की, “भारतीय अंध महिला संघाने धैर्य आणि चिकाटीचे उदाहरण घालून दिले आहे. इंडसइंड बँकेच्या सहकार्यामुळे या गुणी खेळाडूंना जागतिक स्तरावर चमकण्याची नवी संधी मिळाली आहे.”

या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अमेरिका या सात देशांचा सहभाग आहे. १६ सदस्यीय भारतीय संघात काव्या एन.आर., जमुना रानी तुडू, करूणा कुमारी, गंगा कदम, सिमरनजीत कौर, दुर्गा येवले यांसह इतर खेळाडूंचा समावेश असून, देशासाठी गौरव मिळवण्याचा त्यांचा निर्धार ठाम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande