
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईचा आकडा ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रूपये आहे. अनेक मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावर महामंडळाला भर द्यावे लागत आहे.
अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. या अपघातात १९ जणांचा मृत्यु झालेला आहे.तर गंभीर जखमीची संख्या ५२ आहे. किरकोळ जखमीची संख्या ८५ आहे. एकूण १५६ जणांचा समावेश आहे.
पुणे विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. पी फॉर्म आणि कोर्टतून ही आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. या पुढे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करूण तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु