
जळगाव, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शहरातील माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना शिंदे गटाने जळगावमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का दिला.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे, जिजाबाई भापसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर