
जळगाव, 13 नोव्हेंबर (हिं.स.)पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे. जळगावात तीव्र थंडीची लाट असून नाशिक आणि यवतमाळ थंडीच्या लाटेकडे झुकत आहे.
जळगावला ९.१ अंश तापमान नोंदवले गेले. डहाणू, नाशिक, मालेगाव, बीड, यवतमाळ शहरांबरोबरच विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश स्थिती अनुभवली गेली. नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.जळगाव जिल्ह्यात २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जळगावकरांना महिनाभर तरी थंडीचा सामना करावा लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर