जळगाव - नगरपरिषद निवडणुकांसाठी शिवसेनेच्या प्रभारींची नियुक्ती जाहीर
जळगाव , 13 नोव्हेंबर (हिं.स.) नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने जिल्हास्तरावर आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल
जळगाव - नगरपरिषद निवडणुकांसाठी शिवसेनेच्या प्रभारींची नियुक्ती जाहीर


जळगाव , 13 नोव्हेंबर (हिं.स.) नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने जिल्हास्तरावर आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील एकूण १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी अधिकृत प्रभारींची नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्त्यांमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यादीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. नियुक्त केलेल्या प्रभारींवर स्थानिक संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संपर्क राखणे आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेना मुख्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार वरणगाव, भुसावळ, धरणगाव, नशिराबाद नगर परिषदांची जबाबदारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे,भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, शेंदुर्णी (नगर पंचायत) या ठिकाणांसाठी आमदार किशोर अप्पा पाटील ,एरंडोल, पारोळा नगर परिषदांची जबाबदारी आमदार अमोल पाटील ,चोपडा, फैजपूर, यावल नगर परिषदांची जबाबदारी आमदार चंद्रकांत सोनवणे , रावेर, सावदा, मुक्ताईनगर (नगर पंचायत) या ठिकाणांची जबाबदारी आमदार चंद्रकांत पाटील ,तर अमळनेर नगर परिषद प्रभारी म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी निवडणुकीत पक्षाने भक्कम तयारीसह मैदानात उतरण्याचे संकेत या निर्णयातून स्पष्ट दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande