
ठाणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : जगातील पाचव्या क्रमांकाची ज्वेलरी विक्रेता आणि भारतातील सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील अग्रणी संस्था मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने आपली प्रमुख ‘हंगर फ्री वर्ल्ड’ योजना आता इथिओपियामध्ये सुरू केली आहे. भारत आणि झांबियामधील उल्लेखनीय यशानंतर हा प्रकल्प आफ्रिका खंडातील पुढील विकास टप्प्यात प्रवेश करत आहे.
भारतीय करुणा आणि सामूहिक प्रगतीच्या मूल्यांवर आधारित ही योजना दाखवते की भारतीय उद्योग स्थानिक यशातून जागतिक प्रभाव निर्माण करू शकतात. कंपनी आपल्या निव्वळ नफ्याच्या 5 टक्के रक्कमेचा वापर समाजकार्यासाठी करते, जो त्यांच्या अनिवार्य सीएसआर खर्चाच्या दुप्पट आहे.या योजनेची अधिकृत घोषणा दुबई गोल्ड सूक येथील मालाबार इंटरनॅशनल हबमध्ये करण्यात आली. या वेळी मालाबार समूहाचे उपाध्यक्ष. अब्दुल सलाम के.पी. यांनी इथिओपियाचे महावाणिज्यदूत महामहिम असमेलाश बेकेले यांना आशयपत्र सुपूर्द केले. या कार्यक्रमाला कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील सदस्यांची उपस्थिती होती.
‘हंगर फ्री वर्ल्ड’ ही मालाबार गोल्ड अँड डायमंड्सची सर्वात प्रभावी पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय (ईएसजी) उपक्रमांपैकी एक मानली जाते. सध्या या मोहिमेद्वारे जगभरातील 119 ठिकाणी दररोज 1,15,000 हून अधिक जेवण उपलब्ध करून दिली जातात. झांबियामधील यशस्वी अंमलबजावणीनंतर मे 2024 पासून तेथील तीन शाळांमध्ये 9 लाखांहून अधिक जेवणांचे वितरण झाले आहे. मालाबार गोल्ड अँड डायमंड्सची ‘हंगर फ्री वर्ल्ड’ मोहीम जागतिक स्तरावर विस्तारत असून, समाजातील उपेक्षित घटकांसाठी अन्न आणि शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
मालाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले,“हंगर फ्री वर्ल्ड ही आमच्या सर्वात अर्थपूर्ण आणि प्रभावी सामाजिक उपक्रमांपैकी एक आहे. जबाबदार ज्वेलर म्हणून आम्ही ज्या समुदायांना सेवा देतो, त्यांच्याशी आमची बांधिलकी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही. इथिओपिया सरकारसोबतच्या भागीदारीत पुढील दोन वर्षांत सुमारे 8.64 लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल, ज्याद्वारे 2026 अखेरपर्यंत 10 हजार मुलांना दररोजचे भोजन आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट आहे.----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु