
अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणूकीची लगबग सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी केली आहे. राष्ट्रीय पक्षासह राज्य पातळीवरील पक्षात इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी केली आहे. यात मोठ्या प्रमाणात भाजप, शिवसेना ठाकरे गटात उमेदवारांची यादी लांबलचक असल्याने गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. अंजनगाव नगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून बहुतांश वेळा काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. अंजनगाव शहरात मोठ्या प्रमाणात काँग्रेस समर्थकांची संख्या आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस पक्षात मात्र शांतता पसरली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजप, शिवसेना पक्षाचे जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे काँग्रेस पक्षात मात्र अजूनही शांतता पसरली आहे. अंजनगाव नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षात शांतता पसरली असली तरी काँग्रेस पक्षाची आकड्यांचे गणित मात्र विजयाच्या टोकावर आहे. भाजप, शिवसेना दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे दोन्ही पक्षात फुटाफाटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या संधीचा फायदा काँग्रेस पक्ष घेणार असल्याचे संकेत दिसत आहे. अंजनगाव नगरपालिका निवडणुकीत जाती धर्माची आणि काँग्रेस पक्षाच्या समर्थकांची मतदारांची बेरीज वजाबाकी केल्यास काँग्रेस पक्ष शांत जरी असला तरी विजयाच्या टोकावर येऊन पोहचला आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला देते यावरही बरेच अवलंबून राहणार असून अखेरच्या वेळी विजयांची संधी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी