पुणे - आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्राचे ‘ सखी आंगण’ असे मराठी नामकरण
पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथे महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या खाद्य पदार्थ केंद्रातील ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी भारतातील पहिला ई- लिलाव घेण्यात आला होता. या खाद्य
PMC news


पुणे, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथे महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या खाद्य पदार्थ केंद्रातील ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी भारतातील पहिला ई- लिलाव घेण्यात आला होता. या खाद्यपदार्थ केंद्राला ‘सखी आंगण’ हे मराठी नाव देण्यात आले तसेच या केंद्राच्या प्रतिकचिन्ह (लोगो) देखील निश्चित करण्यात आले. या केंद्राचे संचालन पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विक्री केंद्राची उभारण्यात आले आहे.

या आधुनिक इमारतीत एकूण ४९ गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, हे सर्व गाळे विविध महिला बचत गटांना खाद्य पदार्थ विक्री व व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या विक्री केंद्रातील गाळे महिला बचत गटांना भाडेकराराद्वारे देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली देशातील पहिल्या गाळे ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रति गाळा १५,१०० ते ३२,००० रुपयांपर्यंत लिलाव दर नोंदविण्यात आले. एकूण ४९ गाळ्यांपैकी २ गाळे दिव्यांग महिला बचत गटांसाठी, १ गाळा तृतीयपंथी गटासाठी, १ गाळा कोविड योद्धा महिला गटासाठी, २ गाळे आदिवासी गटांसाठी, ३ गाळे दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत गटांसाठी आणि उर्वरित ४० गाळे पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande