हाऊस-वायरसाठी ग्रीनप्रो प्रमाणपत्र मिळवणारी पॉलीकॅब ठरली भारतातील पहिली कंपनी
मुंबई, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। केबल्स आणि वायर्समधील भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी पॉलीकॅबने आणखी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. हाऊस-वायर्स श्रेणीतील त्यांचे प्रमुख उत्पादन, पॉलीकॅब ग्रीन वायर+ चे कौतुक करत भारतीय उद्योग महासंघ - इंडियन ग्रीन ब
मुंबई


मुंबई, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। केबल्स आणि वायर्समधील भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी पॉलीकॅबने आणखी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. हाऊस-वायर्स श्रेणीतील त्यांचे प्रमुख उत्पादन, पॉलीकॅब ग्रीन वायर+ चे कौतुक करत भारतीय उद्योग महासंघ - इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (CII-IGBC) त्यांना प्रतिष्ठित ग्रीनप्रो प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. हे प्रमाणपत्र मिळवणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली असून हा त्यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सुरक्षित, पर्यावरणपूरक, दीर्घकालीन आणि उच्च-कार्यक्षमतेचे विद्युत उपाय देण्याच्या पॉलीकॅबच्या अतूट वचनबद्धतेला ही मान्यता अधोरेखित करते. उत्पादनाच्या संपूर्ण प्रवासात म्हणजेच कच्च्या मालाच्या स्रोतापासून ते उत्पादन, वापर आणि विल्हेवाट लावण्यापर्यंत हे ग्रीनप्रो प्रमाणपत्र पर्यावरणाचे रक्षण होईल, याकडे लक्ष देते. या माध्यमातून इलेक्ट्रिकल व्यवसायात पर्यावरणीय नवोपक्रम चालविण्यामध्ये पॉलीकॅबचे नेतृत्व अधिक भक्कम होते आहे.

ग्रीनप्रो सर्टिफिकेशन हे एक प्रसिद्ध इको-लेबल आहे जे उत्पादनांचे त्यांच्या संपूर्ण प्रवासातील पर्यावरणीय कामगिरीवर आधारित मूल्यांकन करते. या मूल्यांकनाचे सुरक्षितता, टिकाऊपणा आणि पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम कमी करणे हे सगळे कठोर निकष पॉलीकॅब ग्रीन वायर+ अत्यंत प्रभावीपणे पूर्ण करते. यामुळेच घरे आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी हे उत्पादन आदर्श ठरते.

भारतात सध्या पर्यावरणाचे भान वाढत चालले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक इमारत क्षेत्र 12% च्या CAGR ने वाढत आहे. विविध प्रमाणन कार्यक्रमांतर्गत 10 अब्ज चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्र या अंतर्गत नोंदणी करण्यात आलेले आहे. त्यामुळेच पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आणि ऊर्जा-कार्यक्षम सामग्रीची मागणी वाढती आहे. हाच दृष्टिकोन लक्षात घेत ग्रीनप्रो-प्रमाणित वायर्स सुरक्षित, निरोगी आणि पर्यावरणपूरक जागा बांधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज आहेत.

पॉलीकॅब ग्रीन वायर्स+ या 99.97% शुद्ध तांबे वापरून बनवल्या जातात तसेच 90°C पर्यंत उष्णता प्रतिरोधकता सहन करण्याची त्यांची तयारी असते. त्यांची रचनाच तशी केलेली असते. यामुळेच ते उत्कृष्ट कामगिरी तर करतातच पण सुरक्षित वीज वितरणही करतात. या वायर्समध्ये शिसे नसते तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्यातून कमी विषारी धूर उत्सर्जित होतो, ज्यामुळे आरोग्याचा धोका कमी होतो. या वायर्समध्ये उच्च विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच उंदीर, ओलावा आणि घर्षण यांच्यापासून संरक्षणासाठी इन बिल्ट रचना आहे. ज्यामुळे उत्पादनाचा टिकाऊपणा वाढतो. फ्लेमस्टॉप तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि REACH तसेच RoHS अनुरूप म्हणून प्रमाणित करण्यात आलेली पॉलीकॅब ग्रीन वायर्स+ मध्ये 250 हून अधिक धोकादायक घटकांचा वापरच केला जात नाही. परिणामी, ग्राहक आणि पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित होते.

या कामगिरीबद्दल पॉलीकॅब इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य व्यवसाय अधिकारी - B2C, श्री. ईशविंदर सिंग खुराणा म्हणाले, सुरक्षा आणि टिकाऊपणा ही आमच्यासाठी केवळ उद्दिष्टे नाहीत तर त्या जबाबदाऱ्या आहेत. हाऊस वायर्स श्रेणीमध्ये ग्रीनप्रो प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी ठरणे, हा आमच्यासाठी एक अभिमानास्पद टप्पा आहे. याद्वारे सुरक्षित घरे आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठीची आमची वचनबद्धता सिद्ध होते. केवळ विश्वासार्ह आणि उच्च-कार्यक्षमता देणारीच नाही तर ग्राहक आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असलेल्या विद्युत उपायांच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला ही कामगिरी बळकटी देते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande