सोलापूरात हमी भाव केंद्र सुरू न केल्याने प्रति क्विंटल 600 चा फटका
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। मंगळवेढा तालुक्यातील मका उत्पादन शेतकऱ्यांना शासनाने हमीभाव केंद्र सुरू न केल्यामुळे अन्य व्यापाऱ्याकडून प्रतिक्विंटल सहाशे रुपयांचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. अगोदरच अतिवृष्टीने बेजार झालेल्या शे
सोलापूरात हमी भाव केंद्र सुरू न केल्याने प्रति क्विंटल 600 चा फटका


सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

मंगळवेढा तालुक्यातील मका उत्पादन शेतकऱ्यांना शासनाने हमीभाव केंद्र सुरू न केल्यामुळे अन्य व्यापाऱ्याकडून प्रतिक्विंटल सहाशे रुपयांचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. अगोदरच अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना दरातही 600 रुपये मारल्यामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था मका उत्पादक शेतकऱ्यांची झाली.तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदाराकडून मिळणारा अवेळी दर शिवाय उसासाठीचा लागणारा कालावधी यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी अन्य पिकाचा पर्याय म्हणून मका पिकाची निवड केली.तालुक्यामध्ये दूध उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गतवर्षी तालुक्यामध्ये 3816 हेक्‍टर मका पिकाची पेरणी केली. मात्र यंदा त्यामध्ये तिप्पट वाढ होत 10 हजार 981 हेक्टरवर मका उत्पादक शेतकऱ्यांची लागवड केली त्यामुळे यंदाच्या हंगामात मक्याचे क्षेत्र वाढल्यामुळे साहजिकच शेतकऱ्याकडून अन्य पिकाप्रमाणे मका पिकाचे देखील हमीभाव केंद्र सुरू होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande