रायगड - राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करत रवींद्र राऊत इंग्रजी शाळेची सामाजिक कामगिरी
रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त रवींद्र राऊत इंग्लिश मीडियम स्कूल (कोकण उन्नती मित्र मंडळ संस्था) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या कार्ले येथील आदि
राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करत राऊत इंग्रजी शाळेची सामाजिक कामगिरी


रायगड, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त रवींद्र राऊत इंग्लिश मीडियम स्कूल (कोकण उन्नती मित्र मंडळ संस्था) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या कार्ले येथील आदिवासी वाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका नियती रिकामे, उपमुख्याध्यापिका नादिया लोगडे, शिक्षिका शिल्पा पळधे तसेच शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन, शाळेच्या बॅगा, रंगीत पेन्सिली, पाण्याच्या बाटल्या व इतर आवश्यक साहित्य देण्यात आले.

या उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका नियती रिकामे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढावी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा आमचा हेतू आहे.” समाजोपयोगी कार्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव देण्याचा हा उपक्रम ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande