परभणी - श्रीक्षेत्र दत्तधाम येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा
परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने वसमत रस्त्यावरील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे यंदा ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा’ मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पार पडण
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा


परभणी, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने वसमत रस्त्यावरील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे यंदा ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा’ मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून 1008 पोथी वाचक भक्तांच्या सहभागाने पारायण होणार आहे.

येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात इ.स. 1979 साली प.पू. श्री. अखंडानंद ओक स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 1008 भाविकांच्या सहभागाने श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच परंपरेतून, यावर्षी प.पू. श्री. मकरंद महाराज यांच्या प्रेरणेने हा भव्य सोहळा पुनश्च आयोजित केला जात आहे. सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची सुविधा उपलब्ध असून, इच्छुक भक्तांनी अनंत देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री गुरुचरित्र पारायण सोहळा समिती तर्फे करण्यात आले आहे.

श्री दत्त भक्तांच्या सहकार्याने पारायण सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, हरिपाठ, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande