
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। अल कायदा’ दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरेकर यास एका संघटनेने सोलापुरात बोलावून तरुण मुलांसाठी कार्यक्रम ठेवला होता. पण, जेलरोड पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कुंभारीजवळील एका शाळेत तो कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रम घेणाऱ्या संघटनेत ‘सिमी’चे काही सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे.
सोलापुरातून सहा-सात वर्षांपूर्वी पुण्यात गेलेला जुबेर अभ्यासात खूप हुशार होता. तो आयटी इंजिनिअर झाला आणि त्याला कंपनीत वार्षिक २३ ते २५ लाख रुपयांचे पॅकेज होते. तो मूळचा सोलापूर शहरातील असल्याने त्याचे मित्र, ओळखीचे खूपजण शहरात आहेत. तो ‘एटीएस’च्या (दहशतवादविरोधी पथक) कोठडीत आहे. त्याच्या संपर्कात सोलापूर शहरातील काहीजण सतत होते. त्याला सोलापुरात कार्यक्रमासाठी ज्या संघटनेने बोलावले होते, त्यातील एक पदाधिकारी जुबेरसोबत चेन्नईतील कार्यक्रमाला देखील जाऊन आलेला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड