तंबाखूमुक्त जीवनाचा रत्नागिरीतील तरुणांचा निर्धार
रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण रत्नागिरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखूजन्
तंबाखूमुक्त जीवनाचा रत्नागिरीतील तरुणांचा निर्धार


रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण रत्नागिरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण करणे आणि आरोग्यदायी, व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. एन.एस. एस विभागाचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस रसाळ याने सर्वांना शपथ दिली. विद्यार्थी आणि कर्मचारी या सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर न करण्याची आणि समाजात तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीची शपथ घेतली.

“तंबाखूमुक्त भारत - निरोगी भारत” या घोषवाक्याने कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, एनटीपीसी समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, जिल्हा मानसिक आरोग्य कर्मचारी श्वेता मांजरेकर आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande