
रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण विजय 26 सागरी नौका भ्रमण मोहिमेअंतर्गत पूर्णगड जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये विविध उपक्रम करण्यात आले.
स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण या विषयावर आधारित पथनाट्य सादर करून जनजागृती केली. त्यानंतर फेरी काढून पर्यावरण जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भविष्यामध्ये संघभावना, शिस्त, साहसीवृत्ती बाणवावी, याविषयी माहिती माहिती दिली. शिडाची जहाजे, विविध बोटी यांचे कार्य कसे चालते याची माहिती उत्तम प्रकारे दिली.
उपस्थित सर्व अधिकारी, एनसीसी कॅडेट यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी केले. शाळेतील या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षण बीट विस्तार अधिकारी हिरवे मॅडम, केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी