नाशिक - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा
नाशिक, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक विभाग सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची आज विभाग नियंत्रक क्षीरसागर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक विभागातील विविध आगारांतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रलंबित मागण
नाशिक - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा


नाशिक, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।

नाशिक विभाग सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची आज विभाग नियंत्रक क्षीरसागर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक विभागातील विविध आगारांतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रलंबित मागण्यांवर सविस्तर व चर्चा करण्यात आली. या अगोदर संघकडून विभाग नियंत्रकांना सादर करण्यात आलेल्या पत्रातील मुद्द्यांवर क्षीरसागर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस विभागीय वाहतूक अधिकारी बोरसे साहेब, कर्मचारी वर्ग अधिकारी आणि विभागीय कामगार अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस अनुप दादा खैरनार (केंद्रीय उपाध्यक्ष), व्यंकटेश मोरे (प्रमुख मार्गदर्शक), राजाभाऊ पाठक (विभागीय अध्यक्ष), बाळासाहेब आव्हाड (विभागीय सचिव) तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande