
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या दोन्ही बाजूस रिफ्लेक्टर पट्ट्या लावाव्यात, जेणेकरून दोन्ही बाजूने वाहन दिसेल, अशा सूचना देत, मोठ्या आवाजात नशा करून वाहन चालवणे, उसाने भरलेले वाहन वेगाने चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला जाईल, अशा इशारा पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी दिला.श्री संत दामाजी साखर कारखान्यावर रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत रिफ्लेक्टर लावण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलिस हवालदार संभाजी यादव, कॉन्स्टेबल युवराज साळुंखे, सोनाली जुंधळे, संचालक तानाजी कांबळे, सचिन खरात, बंडू करे, तुकाराम लवटे आदींसह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड