सोलापूर - पोलिस प्रशासनाकडून चौकातील अतिक्रमणांवर कारवाई
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। दोन महामार्ग होऊनही महूदमधील चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे महूद ग्रामस्थ कमालीचे त्रासले असून, प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
Cp


सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। दोन महामार्ग होऊनही महूदमधील चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे महूद ग्रामस्थ कमालीचे त्रासले असून, प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. पोलिस प्रशासनाने महूद येथील मुख्य चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून टाकली आहेत. त्यामुळे काही अंशी चौकाने मोकळा श्वास घेतला असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.जत ते इंदापूर हा राष्ट्रीय महामार्ग तर पंढरपूर ते मल्हारपेठ हा राज्य महामार्ग अशा दोन महामार्गांवरील चौकाच्या ठिकाणी असणाऱ्या सांगोला तालुक्यातील महूद येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहने तासन्‌तास अडकून पडत आहेत. शेकडो कोटी रुपये खर्च करून पंढरपूर ते मल्हारपेठ या राज्य महामार्गाचे काम करण्यात आले. हे काम करताना नियमाप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरणच झालेले नाही. हीच अवस्था जत ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत झाली आहे. नियमापेक्षा कमी रुंदीचे महामार्ग बनविण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande