लातूर जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत
लातूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रल
लातूर जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत


लातूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, परकाम्य संलेख अधिनियम कलम १३८ धनादेश अनादरीत प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, कामगार तथा औद्योगिक न्यायालयातील प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच बँक तथा वित्तीय संस्थांची वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळते. तसेच दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकारांच्या आपसी संमतीने होते. लोक अदालतमध्ये प्रकरण आपसी संमतीने निकाली निघाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा वाचतो. लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षकारांच्या संमतीने प्रकरण निकाली निघालेवर न्यायालयीन शुल्क तथा कोर्ट फिस परत मिळते. त्यामुळे पक्षकार व विधीज्ञ यांनी १३ डिसेंबर २०२५ रोजीचे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय जे. भारूका, तसेच सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande