
मुंबई, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘पारू’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हृदयाला भिडणारी कथा आणि प्रेरणादायी पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पारू आणि आदित्यच्या प्रवासाभोवती फिरणारी ही कहाणी आता नव्या वळणावर आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. अलीकडच्या भागांमध्ये, ऑफिस मिटिंगदरम्यान अहिल्या आणि आदित्य समोरासमोर येतात, परंतु अहिल्या त्याच्याशी असलेले आई-मुलाचे नाते लपवते. त्याच मिटिंगमध्ये आदित्य आपल्या चातुर्य आणि मेहनतीच्या जोरावर महत्त्वाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवतो आणि सर्वांना प्रभावित करतो. या घडामोडीमुळे त्याच्या कारकिर्दीला नवा आयाम मिळतो. दरम्यान, पारूची परीक्षा सुरू झालेय आणि ती आपल्या टिफिन व्यवसायासोबत अभ्यासही मनापासून सांभाळतेय. तिच्या या प्रवासात आदित्य तिचा खंबीर आधार बनतो. त्यांच्या नात्यात रोमँटिक गोडी असली तरी त्याचा पाया परस्पर आदर आणि विश्वासावर उभा आहे. त्याचवेळी आदित्य प्रीतमला किर्लोस्कर व्यवसाय टिकवण्यासाठी मदत करत राहतो. पारूच्या वाढत्या यशामुळे दिशा तिच्या टिफिन व्यवसायात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतेय. आता तिच्या चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा हा प्रवास प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल. या मालिकेत एक विशेष प्रसंग घडणार आहे ते म्हणजे आदित्यच्या ड्रीम स्कूल प्रोजेक्टच्या शुभारंभाचा दिवस जवळ आला आहे. संपूर्ण किर्लोस्कर परिवार या सोहळ्याचा भाग बनलाय. पण याच दिवशी पारूची परीक्षा असल्याने ती कार्यक्रमाला पोहोचण्याच्या नादात योगायोगाने अहिल्याच्या गाडीसमोर येते. त्या क्षणी तिला समजतं की अहिल्या स्वतः आपल्या मुलाच्या यशाची साक्षीदार होण्यासाठी आली आहे.
शाळेच्या उद्घटनाच्या निमित्ताने आदित्य- अहिल्याच्या नात्यात परत गोडी निर्माण होईल का ? पारूच्या टिफिन व्यवसायात दिशा अडथळे आणण्यात यशस्वी होईल ? यासाठी बघायला विसरू नका पारू दररोज संध्या ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर