
नांदेड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्यामध्ये त्यांचे महत्व विशेष आहे. नांदेड जिल्हयात सध्या १ लाख १२९ सुक्ष्म, ७२० लघु व ४१ मध्यम असे नोंदणीकृत उद्योग आहेत.
महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्स पर्यंत पोहंचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. शासनाच्या या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापनेकरिता उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजूरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागातंर्गत मैत्री (MAITRI - Maharashtra, Trade and Investment Facilitation Cell) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे पुढील सुविधा विविध 14 विभागांच्या 124 सेवा मैत्री 2.0 पोर्टलवर एकात्मिक करुन उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी या सेवांचा लाभ घ्यावा जेणेकरून जिल्ह्यात उद्योगांची वाढ होईल व जिल्हयाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जिल्हयातील उद्योग व गुंतवणूकदारांनी मैत्री या सहाय्य प्रणालीचा लाभ घेवून पोर्टलवर सक्रीय सहभाग नोंदवावा
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis