अतिवृष्टीनंतर पीक कर्ज घेण्याकडे कल
पुणे, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। रब्बी हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) ३६९ कोटी ८८ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. परिणामी शेतकरी कर्ज घेण्याकडे वळले आह
pik


पुणे, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। रब्बी हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) ३६९ कोटी ८८ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. परिणामी शेतकरी कर्ज घेण्याकडे वळले आहेत. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज दिले जाते. तर तीन लाखांहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अकरा टक्के व्याजदर आकारण्यात येतो. गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या उद्दिष्टामध्येही वाढ केली आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे उद्दिष्ट मागील वर्षी होते. त्यामध्ये आत्तापर्यंत २८ हजार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८६ लाख रुपयांचे पीककर्ज दिले होते. यावर्षी त्यात वाढ करून उद्दिष्ट हे ६८९ कोटी ३२ लाख एवढे ठेवले आहे. रब्बी हंगामात आंबेगाव, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्यातील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.पीककर्जाची मागणी ज्याप्रमाणात होईल, तेवढे बँकेकडून कर्जवाटप केले जात आहे. त्याप्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. यावर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप होईल, असा आमचा अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande