
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालकुमार मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या निमित्ताने बालमित्रांची अक्षरफुले या अनोख्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, लघुकथा, कविता यांचे संकलन करून हे कॉफीटेबल बुक बनवण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या उपस्थितीत या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु