
परभणी, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणूकीतील प्रचंड विजयाचा भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी परभणीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व जोरदार घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, विलास बाबर, श्रीधर देशमुख, मोकींद खिल्लारे, भालचंद्र गोरे, हम्मु चाऊस, लक्ष्मीकांत क्षीरसागर, बबलू टाक, सचिन अंबिलवादे, रितेश जैन, शिवाजीराव मवाळे, शंकर आजेगांवकर, दिनेश नरवाडकर,राजेश देशपांडे, प्रवीण चौधरी, सौ. मंगल मुदगलकर, प्रशांत सांगळे, अद्वैत पार्डीकर, सुशिल देशमुख, प्रभावती अन्नपूर्णे, मोहन कुलकर्णी, ऋतुजा जोशी, छाया मोगले, मनिषा जाधव, प्रभाकर पाटील वाघीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis