नांदेड - जिल्हाधिकाऱ्यांनी राहाटी पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामांची केली पाहणी
नांदेड, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। नांदेड तालुक्यातील नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखानाच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) या गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट दिली. त्यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करुन श
Q


नांदेड, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। नांदेड तालुक्यातील नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखानाच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) या गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट दिली. त्यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करुन शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय दुध विकास मंडळ, दिल्ली (एनडीडीबी) मार्फत पुरविल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतन सुविधांची तपासणी केली. कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या कालवडीची पाहणी करून पशुपालकांनी या अत्याधुनिक सेवांचा अधिकाधिक लाभ घेवून आपल्या घरीच उच्च वंशावळीच्या कालवडी तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत सुरू असलेल्या दिगंबर के. बोकारे यांच्या पनीर निर्मिती उद्योगाची पाहणी करत त्यांनी उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता आणि बाजारपेठेची माहिती घेतली. सदर शेतकरी दररोज गावातच उत्पादन झालेल्या 400 लिटर दुधापासून दररोज 180 किलो स्वच्छ, ताजे व भेसळमुक्त पनीर तयार करून नांदेड शहरास पुरवठा करतात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

नांदेड जिल्ह्यात सुरू होणाऱ्या विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन प्रकल्पातील योजनांचा व महिलांच्या मराठवरहाड दूध उत्पादक कंपनीचा व राष्ट्रीय दुध विकास मंडळ दिल्ली यांचेमार्फत बायोगॅस प्रकल्प उभारणीच्या उपक्रमाचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत नांदेड जिल्ह्यात कृत्रिम रेतनाचे प्रमाण दुप्पट करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. या अनुषंगाने “एक गाव एक फार्म गृहीत धरुन हा प्रकल्प राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

भेटीदरम्यान श्री. कर्डीले यांनी मराठवऱ्हाड दूध उत्पादक कंपनीचे सहायक ज्ञानोबा बोकारे, माधव मारोती बोकारे आणि दिगंबर केशवराव बोकारे यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पाडिले, पशुधन विकास अधिकारी नाळेश्वर डॉ. दीप्ती एम. चव्हाण तसेच कृत्रिम रेतन तंत्रज्ञ परसराम जमदाडे उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande