हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतदान केंद्राची केली पाहणी
हिंगोली, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार‍ हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल
2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान होणार


हिंगोली, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार‍ हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान होणार आहे.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली शहरातील अण्णाभाऊ साठे वाचनालय, इकबाल उर्दू स्कूल पेन्शनपुरा, गोपीनाथ मुंडे शेतकरी भवन, भारती विद्यामंदीर, नगर परिषद शाळा, आजम कॉलनी येथील इकबाल इंटरनॅशनल स्कूल, माहेश्वरी भवन येथील मतदान केंद्राना भेटी देऊन मतदानाच्या दिवशी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande