
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पतंगे आणि शिक्षक राजू सावंत, निखीलकुमार नवले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या, शैक्षणिक साधनसामग्री, राबविण्यात येणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली आणि गणित व इंग्रजी विषयावर विशेष भर देण्याचे शिक्षकांना सुचविले.
6 वी व 7 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि नियमित अध्ययनाचे महत्त्व पटवून दिले.
एकूणच शाळेचे वातावरण, शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis