
बीड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धारूर शहराध्यक्ष पदी व धारूर नगरपरिषद निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून डॉ.मयूर सावंत यांची निवड करण्यात आली. आज धारूर येथे झालेल्या एका विशेष बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भात नियुक्तीचे पत्र दिले आहे.
या संदर्भात बोलताना आमदार सोळंके म्हणाले की, आपण ही जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातुन आपली एकनिष्ठता तसेच आपल्या आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणुक व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास आपण अग्रेसर राहाल हीच अपेक्षा
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis