
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : तब्बल 82.53 किलो कोकेन जप्त केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने देखील ड्रग्ज तस्करी विरोधात कारवाई सुरू केलीय. याप्रकरणी ईडीने आज, शुक्रवारी दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानात अनेक ठिकाणी छापेमारे केली. ईडीला या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि मनी लॉन्ड्रिंगचा संशय आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सकाळी 7 वाजल्यापासून सुरू आहे.
ड्रग्ज तस्करीवर कारवाईचा बडगा उगारत ईडीने दिल्ली–एनसीआरमधील अनेक ठिकाणी तसेच राजस्थानातील जयपूरमध्ये छापे टाकले. 82.53 किलो कोकेनची जप्ती झाल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या वेगवेगळ्या टीम्सनी आज सकाळी 7 वाजता छापेमारी सुरू केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणांवर धाड टाकण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय नेटवर्क सहभागी असल्याचा ईडीला संशय असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
ईडीने नुकतेच 82.53 किलो कोकेन जप्त केले होते, त्यानंतर सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या. ईडी, एनसीबी आणि डीआरआय यांनी शोधमोहीम तीव्र केली असून बंदरे, विमानतळ, लॉजिस्टिक हब यांसह अनेक ठिकाणी धाडसत्र चालू आहे.तपास यंत्रणांना संशय आहे की ड्रग्ज तस्कर बनावट कंपन्या तयार करून हवाला मार्गाने देशातील ड्रग्ज नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच देशातील अनेक मोठी शहरे ड्रग्ज तस्करांच्या निशाण्यावर असल्याचेही समोर येत आहे.
ईडी कोकेनशी संबंधित वित्तीय नेटवर्कचीही कसून छाननी करत आहे. ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगसोबतच आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि स्थानिक हँडलर्सही सहभागी असू शकतात. याच पार्श्वभूमीवर ईडीने शुक्रवारी सकाळपासूनच छापेमारी करून डिजिटल पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण नेटवर्कचे मॅपिंग करत ईडी ड्रग्ज तस्करीचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी