
भोपाळ, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।मध्य प्रदेशातील रतलाम येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेवर शुक्रवारी एक वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 वर्षांचा एक मुलगाही समाविष्ट आहे.
माहितीनुसार,हि घटना सकाळी सुमारे 8 वाजता घडली आहे. रावटीपासून 10 किलोमीटर अंतरावर भीमपुरा गावाजवळ माही नदीच्या पुलापूर्वी ही घटना घडली. एमएच 03 इएल 1388 क्रमांकाची कार दिल्लीहून मुंबईकडे जात होती. एक्सप्रेसवेवर वाहन अचानक अनियंत्रित झाले आणि दरीत पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि हायवे पेट्रोलिंग पथक घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले.यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले.
पोलिस स्टेशन प्रभारी सुरेंद्रसिंह गडरिया यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना सूचना देण्यात येत आहे. या अपघाताचे कारण तपासले जात असून प्राथमिक तपासात अतिवेग हेच कारण असल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode