गोदरेज ऍग्रोव्हेट आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये सामंजस्य करार
विशाखापट्टनम, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड कृषी खाद्य व्यवसायातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने आंध्र सरकारसोबत स्थानिक आर्थिक गुंतवणुकीसाठी करार केला आहे. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड कंपनी आंध्
विशाखापट्टनम


विशाखापट्टनम, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड कृषी खाद्य व्यवसायातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने आंध्र सरकारसोबत स्थानिक आर्थिक गुंतवणुकीसाठी करार केला आहे. गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड कंपनी आंध्र सरकारसोबत ७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गोदरेज ऍग्रोव्हेटची ही गुंतवणूक आंध्र प्रदेशातील डेअरी क्षेत्राला चालना देईल. पामतेलचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 'समाधान केंद्र' नामक एक खिडकी केंद्राची उभारणी करेल. यामुळे कृषी उत्पादकता आणि मूल्यवर्धन वाढवण्यास मदत होईल. हा करार कंपनीकरिता बंधनकारक नसेल.

हा सामंजस्य करार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. नारा चंद्राबाबू नायडू गारू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया आणि गोदरेज इंडस्ट्रीज समूहाचे समूह अध्यक्ष, कॉर्पोरेट अफेअर्स राकेश स्वामी उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री श्री. नारा चंद्राबाबू नायडू यांनी राज्यात आर्थिक वृद्धी होत यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली. आमच्या भूमीतील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी खाद्य प्रक्रिया क्षेत्राचे बळकटीकरण व्हायला हवे. याच धोरणाशी सुसंगत राहून आम्ही गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडसारख्या सशक्त आणि विश्वासार्ह कंपनीसोबत भागीदारी करत आहोत. ही भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या कृषी परिसंस्थेचे सशक्तीकरण होईल. मोठ्या प्रमाणात सामुदायिक स्तरावर शाश्वत उपजीविका निर्माण करेल. शिवाय आर्थिक विकासालाही चालना मिळेल., असे ते म्हणाले.

गोदरेज ॲग्रोवेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील कटारिया म्हणाले, आम्ही उद्योग व्यवसायांना पाठिंबा देणाऱ्या आणि समुदायांचा विकास घडवणाऱ्या परिसंस्थेचे पालन पोषण केल्याबद्दल आंध्रप्रदेश सरकारचे आभारी आहोत. या सामंजस्य करारातून शेतकऱ्यांचे बळकटीकरण करण्यावर आमचा भर राहील. हा करार आमच्या कृषी खाद्य प्रक्रिया क्षमतेला बळकट करण्याच्या आमच्या उद्देशाची साक्ष येतो. आमचा खाद्य प्रक्रियेत मोठा वारसा आहे. कृषी भूमीचे पोषण व्हावे याकरिता आवश्यक सुधारणा घडवून आणणे, कृषी आर्थिक व्यवस्थेचा विकास घडवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या गुंतवणुकीकरिता गोदरेज ॲग्रोवेटची उपकंपनी असलेल्या क्रीमलाईन डेअरी प्रोडक्टस सहभागी होईल. ही कंपनी 'गोदरेज जर्सी' या ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने विकते. क्रीमलाईन डेअरी प्रोडक्टस तीन टप्प्यांमध्ये आपली डेअरी प्रक्रिया आणि मूल्यावरतीत उत्पादनाची क्षमता वाढवण्यावर भर देईल.

गोदरेज ॲग्रोवेटकडून देशातील सर्वात जास्त पाम तेल प्रक्रियेचे उत्पादन केले जाते. हा व्यवसाय शेतकऱ्यांसोबत राबवला जातो. या व्यवसायाकरिता आंध्र प्रदेशातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी समाधान केंद्रे उभारली जातील. पाम तेलाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणारा शेतकऱ्यांना पुरेशी माहिती आणि आवश्यक साधने समाधान केंद्रातून पुरवली जातील. उत्पादनाच्या वाढीकरता आवश्यक सर्व समावेशक योजना आणि उपाययोजना पुरवल्या जातील. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ होईल.

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप अध्यक्ष, कॉर्पोरेट अफेअर्स, राकेश स्वामी म्हणाले, ‘‘आंध्र प्रदेश हे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपसाठी महत्त्वाचे राज्य ठरले आहे. या राज्याने आमच्या विविध क्षेत्रांतील वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे, राज्याच्या व्यवसायिक गती आणि भागीदारी आधारित दृष्टीकोन दर्शवते. आंध्र प्रदेश सरकराने आवश्यक मंजुरी प्रक्रिया व्यवस्थित राबवल्यने तसेच गुंतवणूकदार अनुकूल धोरणांमुळे हा करार यशस्वीरित्या पार पडला. आम्ही आंध्र प्रदेशच्या विकासात योगदान देण्यास इच्छुक आहोत. आमच्या समूहाच्या विस्तार ग्राहक उत्पादने, स्थावर मालमत्ता आणि वित्त व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’’

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande