पुणे : जप्त वाहनांचा १८ नोव्हेंबर रोजी जाहिर ई-लिलाव
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण २९ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्
पुणे : जप्त वाहनांचा १८ नोव्हेंबर रोजी जाहिर ई-लिलाव


पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण २९ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहिर ई-लिलावाद्वारे विक्रीस ठेवण्यात आली आहेत.वाहने जशी आहेत तशी या तत्वावर विकली जाणार असून, सदर ई-लिलाव रद्द अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पुणे यांच्याकडे राखीव आहेत. ही वाहने वाघोली वाघेश्वर वाहनतळ आवारात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणीकरिता उपलब्ध आहेत.वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा ज्या कोणाचे हितसंबंध आहेत त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी महसूल भरून किंवा हक्क सांगून वाहने सोडवून घेता येतील. लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही, असेही आवाहन कराधान प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande