'कैरी' सिनेमा येत्या १२ डिसेंबरपासून चित्रपटगृहात
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। आजकाल कोणत्या सिझनला काय काय बदल होतील सांगता येत नाही. हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात गरमी हे सार सुरुच आहे. इतकंच काय आता तर मार्च -मेदरम्यान येणारी कैरीही डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे. ऐकून तुम्हीही गोंधळात ना?, हो.
'कैरी' सिनेमा येत्या १२ डिसेंबरपासून चित्रपटगृहात


मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। आजकाल कोणत्या सिझनला काय काय बदल होतील सांगता येत नाही. हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात गरमी हे सार सुरुच आहे. इतकंच काय आता तर मार्च -मेदरम्यान येणारी कैरीही डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे. ऐकून तुम्हीही गोंधळात ना?, हो. ‘कैरी’ हा मराठमोळा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला संबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच या चित्रपटाची उत्सुकता होती. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी' हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

'कैरी' या चित्रपटात सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे दिसतंय. दिग्दर्शक शंतनू रोडे पॉवरपॅक्ड कलाकारांना ‘कैरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. इतकंच नाहीतर या चित्रपटात सायली संजीव आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

‘कैरी' या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. या स्टुडिओने बऱ्याच भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘कैरी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. तसेच, चित्रपटाला संगीत दिलंय ‘निषाद गोलांबरे’ आणि ‘पंकज पडघन’ यांनी; तर पार्श्वसंगीत दिलंय ‘साई पियूष’ यांनी.

दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या ‘कैरी’ या सिनेमात आपल्याला रोमँटिक थ्रिलर असे कोणते ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता या पोस्टरने वाढविली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande