
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी तपासणीत पंढरपूर सांगोला रोडवरील खर्डी येथे अशोक लेलँड मिनी टेम्पो, कार गाडी व 150 बॉक्स ॲड्रियल व्हिस्की नावाची दारू पकडली. पहाटे कारवाईत दोन लाख 16 हजाराची दारु आणि 14 लाखांची वाहने असा एकूण 16 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
याविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक टी. वाय, मुजावर म्हणाले, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड