
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तिकीट दरात सव्वा पट ते दोन पट वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या सादर केला आहे. प्राणी संग्रहालयाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढल्याने शुल्कवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे यापूर्वी २०१८ मध्ये तिकीट दरवाढ केली होती.कात्रज प्राणी संग्रहालयात प्राण्यांची वाढत असून, नवनवीन दुर्मिळ प्राण्यांचा या संग्रहालयात समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नव्या प्रजातींसाठी उभारली जाणारी प्रदर्शने, संग्रहालयाची देखभाल दुरुस्ती, नव्या प्राण्यांसाठी तयार केले जाणारे खंदक, त्यांचे खाद्य, उपचार यासाठीचा खर्च वाढत चालला आहे. महापालिका आयुक्तांनी काही आठवड्यांपूर्वी प्राणी संग्रहालयास भेट दिली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु