
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकानेच १२ वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. धनाजी सोपान इंगळे (वय ४८, ता. मोहोळ) असे त्याचे नाव आहे.१४ एप्रिल २०२३ रोजी पीडिता शाळेत गेल्यावर तिला शिकविणारे शिक्षक धनाजी इंगळे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पीडितेला वर्गात थांबवून घेतले व इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबायला सांगितले. त्यावेळी वर्गातच शिक्षकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. शाळेशेजारील शेतकऱ्याने ते पाहिले आणि त्यांना शिक्षकाचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे दोन-तीन दिवसांपासून त्या शिक्षकावर त्यांनी लक्ष ठेवले. १५ एप्रिल २०२३ रोजी भावाच्या मदतीने त्या शेतकऱ्याने वर्गात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्या दिवशीची घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. ते चित्रीकरण घेऊन मुख्याध्यापकासमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून शेतकऱ्याने कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष कबूल करावे, असे स्पष्ट केले. त्यावेळी कोणीही समोर आले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड