
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा सैनिक कल्याण विभाग, सोलापूर व त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कार्यालयातील लिपिक टंकलेखक गट–क पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्यासाठीची अंतिम मुदत पूर्वी 5 नोव्हेंबर 2025 होती. मात्र अधिकाधिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून आता 26 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. या भरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात व सूचना सैनिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahasainik.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहेत.जिल्हा सैनिक कल्याण विभागाने इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन केले आहे. ही भरती प्रक्रिया सैनिक कल्याण विभागाच्या प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची असून, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड